[responsive_slider]
 • युवराज सिंगला ग्वाल्हेर विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’ पदवी
  ग्वाल्हेर आयटीएम विद्यापीठाच्या वतीने युवराज सिंगला ‘मानद डॉक्टरेट’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. क्रिकेटच्या मैदानातील योगदानबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला आसाम विद्यापीठ आणि महेंद्रसिंह धोनीला मोंटफोर्ड विद्यापीठाकडून डॉक्टरेट उपाधी देऊन गौरवण्यात आले होते. याशिवाय भारताचा माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाची वॉल असे…
  Continue reading »
 • पाकिस्तानकडून यावर्षी ७२० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन
  पाकिस्तानने या वर्षी आंतरराष्ट्रीय सीमा आणि लाइन ऑफ कंट्रोलवर ७२० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मागील सात वर्षांतील शस्त्रसंधी उल्लंघनाचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर यावर्षी, ऑक्टोबरपर्यंत ७२४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. तर २०१६ मध्ये…
  Continue reading »
 • इराणमधील चाबहार बंदराचे उद्घाटन
  भारताच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या इराणमधील चाबहार बंदराच्या पहिल्या विस्तारित टप्प्याचे ३ डिसेंबर २०१७ ला इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या बंदरामुळे भारताला इराणमधून अफगाणिस्तानशी संपर्क साधता येणार आहे. तसेच येथून पूर्वेला केवळ ८० किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या किनाऱ्यावर चीन विकसित करत असलेल्या ग्वादर या बंदराला शह…
  Continue reading »
 • मेरी कोम:  भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निरीक्षक पदाचा राजीनामा
  बॉक्सर एम.सी.मेरी कोमने भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निरीक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. कोणत्याही सक्रिय खेळाडू राष्ट्रीय स्तरावर निरीक्षक म्हणून कार्यरत राहता येणार नाही, असे क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर मेरी कोमने पदाचा राजीनामा दिला. तत्कालीन क्रीडामंत्री विजय गोयल यांनी मार्च २०१७ मध्ये १२ खेळाडूंची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती…
  Continue reading »
 • सलील पारेख: इन्फोसेसच्या CEO पदी नियुक्ती
  भारतातील अग्रगण्य आयटी कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इन्फोसेसने सलील एस. पारेख यांची कंपनीच्या मुख्याधिकारी (सीईओ) आणि मॅनेजिंग डायरेक्टर (व्यवस्थापन संचालक) पदी नियुक्ती केली. दोन जानेवारी२०१८ पासून ते पदभार स्वीकारतील. सध्या पारेख हे मुळची फ्रान्सची असणारी आयटी कंपनी ‘कॅपजेमीनी’चे ग्रुपच्या कार्यकारी बोर्डाचे सदस्य आहेत. त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापिठातून कंप्युटर सायन्स आणि मेकॅनिकल…
  Continue reading »
 • हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धा २०१७: ताइ त्झू यिंग विजेती,सिंधू उपविजेती
  भारताच्या पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिला एकेरीच्या अंतिम लढतीत तैवानच्या ताइ त्झू यिंगने सिंधूवर २१-१८, २१-१८ अशी मात केली आणि जेतेपद राखले. जागतिक क्रमवारीत २२ वर्षीय सिंधू तिसऱ्या, तर २३ वर्षीय ताइ अव्वल स्थानावर आहे. यापूर्वी या दोघी दहा वेळा आमनेसामने…
  Continue reading »
 • तिहेरी तलाक दिल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास
   मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक या अनिष्ट प्रथेला सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवल्यानंतर आता, अशा प्रकारे जर कोणत्याही मुस्लिम पतीने आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तिहेरी तलाक पद्धत संपुष्टात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार केंद्र सरकारने नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांकडे…
  Continue reading »
 • विमानात हवेतइंधन भरण्याचा प्रयोग यशस्वी
  भारतीय हवाई दलाने  विमान उड्डाणावस्थेत असताना एमब्रार एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम या विमानात आयएल-78 या टँकर विमानातून हवेतच इंधन भरण्याचा केलेला  प्रयोग यशस्वी ठरला. एमब्रार एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (अवॉक्स) हे टेहळणी विमान असनू या  विमानाला भारताचे आकाशातील नेत्र म्हटले जाते. या विमानात आता हवेतच इंधन…
  Continue reading »
 • दिया मिर्झा: संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण दूत
  अभिनेत्री दिया मिर्झाची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँचेट, ऐनी हॅथवे, एंजेलिना जोली, कॅटी पेरी आणि एमा वॉटसन ह्या देखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण दूत म्हणून काम करत आहेत. भारतातील वाइल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाची देखील दिया ब्रँड अॅबेसिडर आहे.  भारतात पर्यावरण आणि वन्य प्राण्यासांठी दिया…
  Continue reading »
 • वसतिगृहांमध्ये राष्ट्रगीत सक्ती
  विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी राजस्थान सरकारने वसतिगृहात राष्ट्रगीत अनिवार्य केले आहे. राजस्थान सरकारच्या सामजिक न्याय विभागाने हा निर्णय घेतला आहे. इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातींमधील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सर्व ७८९ वसतिगृहांना याबद्दलचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व वसतिगृहांमध्ये दररोज सकाळी ७ वाजता राष्ट्रगीत म्हटले जाईल. त्यामुळे…
  Continue reading »